राम मंदिर उडवण्याची धमकी

0

अयोध्या, लोकशाही न्युज नेटवर्क 

अयोध्येतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. दहशतवाद्यांच्या जैश ए मोहम्मद नावाच्या संघटनेने मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. दहशतवाद्यांनी ऑडिओ क्लिप पाठवून मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून ऑडिओ क्लिपची तपासणी सुरू आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ऑडिओ क्लिपमुळे बोलणारी व्यक्ती आपलं नाव आमिर असल्याचं सांगतोय. तो राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देतोय. “आमच्या मस्जिदला हटवून तिथं राम मंदिर बनवलं जात आहे. आता मंदिरला बॉम्बने उडवून देऊ. आमचे तीन सहकारी कुर्बान झाले आहेत. आता यावेळी मंदिरला पाडावच लागेल”, असं अतिरेकी ऑडिओ क्लिपमध्ये म्हणताना दिसतोय.

संबंधित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर गुप्तचर यंत्रणांपासून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाले आहेत. राम मंदिरसह काही प्रमुख प्रतिष्ठानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2005 मध्ये रामजन्मभूमीवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे जैश ए मौहम्मद याच संघटनेचा हात होता हे नंतर समोर आलं होतं. जैशकडून वारंवार अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.