दुसऱ्याच्या रेल्वे तिकीट बुकिंगवर IRCTC चा खुलासा..

खरंच होणार का जेल? , काय आहे सत्य

0

 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

दळणवळणसाठी रेल्वे अत्यंत सोयीस्कर आहे. मात्र रेल्वेच्या प्रवासात प्रवाशांनी नियमांचे उल्लंघन केल्यास रेल्वे प्रशासन कडक शिक्षाही देते म्हणून हे नियम प्रवाशांकडून गांभीर्याने पाळले जातात. त्यातच गेल्या काही दिवसांपासून एका चर्चेला उधाण आलं आहे.

” आयआरसीटीसीच्या बुकिंग आयडीवरुन एखाद्या प्रवाशाने इतर कोणासाठी तिकीट बुक केलं तर कारावास होतो ” या बातमीवर आता आयआरसीटीसीने स्पष्टीकरण दिले आहे.

याबाबत आयआरसीटीसीने ‘एक्स’ वरुन स्पष्टीकरण दिलं आहे. ही ‘शुद्ध अफवा’ असल्याचं आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ही चर्चा आणि वृत्त निराधार आहे. अशा खोडसाळ वृत्तांना थारा देऊ नये असं आवाहनही रेल्वेकडून करण्यात आलं आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकिटांचं बुकिंग रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच केलं जात असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

https://x.com/IRCTCofficial/status/1805567775387091240

‘सोशल मीडियावरील चर्चाही संपूर्ण निराधार आहे. एका आडनावाच्या व्यक्तीने आपल्या खात्यावरुन इतर कुणाचं तिकीट बुक केल्यास रेल्वे किंवा आयआरसीटीसी कोणतीही कारवाई करत नाही किंवा बुकिंग करणाऱ्याला शिक्षाही होत नाही’ असं आयआरसीटीसीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘तुमच्या आयआरसीटीसी खात्यावरुन मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही तिकीट बुक करु शकता. एक युझर महिन्याला 12 तिकिटं काढू शकतो. आधार कार्डाद्वारे व्हेरिफाय केलेला युझर एका महिन्यात 24 तिकिटं काढू शकतो,’ असंही आयआरसीटीसी आणि रेल्वे बोर्डाने या निमित्ताने स्पष्ट केलं आहे. रेल्वे बोर्डाच्या प्रवक्त्यांकडूनही सोशल मीडियावरील चर्चा अफवा असल्याचं सांगितलं आहे. मात्र, पर्सनल युझर आयडीचा वापर करुन बुक केलेली तिकिटं विकता येत नाहीत. अशी विक्री करणं हा गुन्हा आहे. कोणी हे कृत्य करत असल्यास रेल्वे ॲक्ट 1989 च्या कलम 143 खाली कारवाई होऊ शकते असंही या निमित्ताने रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.