जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळगावात वृक्षारोपण

0

जळगाव ;– 5 जून हा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळगाव आगार येथे वनविभाग व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण करण्यात आले. वृक्षारोपण जळगाव आगाराचे आगार व्यवस्थापक श्री संदीप पाटील सर व सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिमंडळ अधिकारी सौ रोहिणी थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशन चे समन्वयक हेमंत बेलसरे, मदन लाठी आणि एल जी आर फाउंडेशन चे अध्यक्ष तथा एस टी महामंडळाचे कर्मचारी प्राध्यापक रवी नेटके यांनी वसुंधरा अभियानाची आगारात वृक्ष लागवड करुन सुरुवात केली. यावेळी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्त साधून पर्यावरण दिनानिमित्त मदन लाठी यांनी शपथचे वाचन केले. यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रवी नेटके यांनी केले प्रास्तावित मदन लाठी यांनी केले व आपले मनोगत व्यक्त करताना आगार व्यवस्थापक श्री संदीप पाटील सर यांनी वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.