वीज पडून बैल व गोऱ्हा ठार, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

0

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून एक गोरा व एक बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना दि. ९ रोजी घडली. या घटनेमुळे सदर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली.

पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे दि. ९ रोजी दुपारी ४ वाजेपासून वादळ वाऱ्यासह तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे मुसळधार पावसामुळे लोणी येथील शेतकरी किशोर विनायक पाटील यांच्या शेतात वीज कोसळल्याने त्यांच्या मालकीचे एक गोरा व एक बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.

सदरची घटना कळताच गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. परंतु गोरा व बैल जागीच गतप्राण झाले होते. या बाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. शांताराम पाटील व डॉ. असिफ कुरेशी व त्यांच्या टीमने सदर घटनास्थळी जाऊन जनावरांची पाहणी केली. त्यानंतर मयत गुरांचे शविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे सदर शेतकऱ्याचे दोन जनावरे दगावली आहेत. याबाबत शासन स्तरावरून शेतकऱ्याला मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.