पहूरला राष्ट्रीय महामार्गावर जिवघेणा खड्डा ! वाहन चालकांची कसरत

नॅशनल हायवे अथॉरिटीने लक्ष देण्याची मागणी 

0

पहूर, लोकशाही न्युज नेटवर्क 

जळगाव – छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर वाघुर पुलानजीक जिवघेणा खड्डा पडला असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे .

जळगाव -छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत नवीन पुलाचे काम सुरू आहे सुरू आहे. सध्या एकाच पुलावरून लहान – मोठी हजारो वाहने ये – जा करतात. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. बसस्थानक ते पुलादरम्यानच्या भागाचे कॉंक्रिटीकरण करणे बाकी असल्याने कच्च्या मार्गावर वारंवार खड्डे पडतात. याच १०० मीटरच्या परिघात बालकवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे सह ३ निरपराध नागरिकांचे नाहक बळी गेलेले असून अद्यापही पुलानजीकचा भाग कठड्यांअभावी ‘मौत का कुआ ‘ बनलेला आहे .

‘नॅशनल हायवे ऑथॉरिटी ‘ चे दुर्लक्ष

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाचे काम गतीने सुरू केले तरी पहुर पेठ गावाकडून पुलानजीकच्या भागास सुरक्षा कढडे लावण्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे . स्थानिक पदाधिकाऱ्यांसह ‘नॅशनल हायवे ऑथेरीटी ‘ ने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.