कुलगुरुंच्याहस्ते विद्यापीठातील ९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप

0

जळगाव ;- कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेवेतील ९ जण शुक्रवार दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला.

विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेतील प्रा.एस.टी.बेंद्रे, उपकुलसचिव (विधी व माहितीचा अधिकार) डॉ.एस.आर.भादलीकर, सहाय्यक कुलसचिव एस.डी.बच्छाव, कक्ष अधिकारी मनोज भावसार व भैय्या पाटील, सहाय्यक भिकन पाटील, वाहन चालक आर.डी.पाटील आणि शिपाई पंडीत फाजगे व राजेश अवचारे हे ९ जण विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झाले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी प्र.कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील, वित्त्‍ व लेखाधिकारी सीए. रवींद्र पाटील हे उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ कर्मचारी संघटना, मागसवर्गीय कर्मचारी संघटना आणि पतपेढी यांच्या वतीने देखील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कक्ष अधिकारी प्रवीण चंदनकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.