अखेर या तारखेला होणार नवीन नीट परीक्षा

0

 

नवी दिल्ली

 

देशभरात नीट परीक्षेचा मोठा गोंधळ उडाला होता. नीट परीक्षेच्या निकालानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नीट परीक्षा परत घेतली जाणार असून त्याची नवी तारीख आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेतली जाणार आहे.

 

नीट परीक्षेचे प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहोचले होते. दरम्यान अनेक ठिकाणी पेपर फुटल्याचाही दावा करण्यात आला होता. आता ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 23 जून 2024 रोजी परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अचानक ही 23 जून 2024 नीट परीक्षा देखील रद्द करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून परीक्षेच्या नव्या तारखेची वाट पाहत आहेत.

 

११ ऑगस्ट रोजी होणार नीट परीक्षा 

आता नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. नीटची परीक्षा आता 11 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. आता अवघ्या काही दिवसांवर ही परीक्षा आलीये. प्रश्नपत्रिका ही तीन तास अगोदर तयार होणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG 2024 परीक्षेची डेटशीट जारी केली आहे. त्यानुसार ही परीक्षा आता 11 ऑगस्ट 2024 रोजी होईल.

 

नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना 720 मार्क पडल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यामध्ये असे बरेच विद्यार्थी होते, ज्यांनी एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. विशेष म्हणजे 2023 मध्ये असा एकही विद्यार्थी नव्हता, त्याला 720 पैकी 720 मार्क पडले. मात्र, यंदा अचानक 720 पैकी 720 विद्यार्थ्यांना मार्क पडले आणि एवढ्या मोठ्या संख्येत. या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला आणि एकच गोंधळ निर्माण झाला. आता NEET PG 2024 ची परीक्षा दोन सत्रामध्ये घेतली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.