पिकनिक जीवावर बेतली, धरणात बुडून ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

0

रायगड, लोकशाही न्युज नेटवर्क 

रायगडमधून मोठी बातमी समोर आली आहे. रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाचे ४ बळी गेले आहेत. मुंबईतून पावसाळी सहलीसाठी गेले असता ही घटना घडली. सत्य साईबाबा ट्रस्टने बांधलेल्या धरणात चार तरुण बुडाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. हे सर्व तरुण मुंबईतल्या नामांकित कॉलेजमध्ये शिकत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून ३७ तरुण आणि तरुणी पावसाळी सहलीसाठी रायगडमध्ये गेले होते. हे सर्वजण खालापूर तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी येथे असलेल्या धरणावर सहलीसाठी गेले होते. हे धरण सत्य साईबाबा ट्रस्टने बांधले आहे. या धरणामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या ४ तरुणांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला. हे चारही तरूण मुंबईतल्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली.

तरुण धरणामध्ये बुडाल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या चारही तरुणांचे मृतदेह शोधून बाहेर काढले. एकलव्य सिंग, ईशांत यादव, आकाश माने आणि रणत बंडा अशी मृत तरुणांची नावं आहेत. या चारही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. रायगड पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली आहे. तरुणांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.