AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ! वाचा नेमकं वापरायचं कसं?

सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

0

लोकशाही न्युज नेटवर्क 

 

सोशल मीडिया प्लाटफॉर्म प्रमाणे आता एआय देखील काळाची गरज बनला आहे. व्हॉट्सअपची मूळ कंपनी असलेली मेटाने आपल्या सर्व सोशल मिडिया प्लाटफॉर्मवर एआय फिचर्स उपलब्ध केला असल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर एआय चॅटबॉट उपलब्ध झाला आहे. यामुळे आता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर मिळणार आहेत.

 

व्हॉट्सअप हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं चॅटिंग प्लॅटफॉर्म आहे. या ॲपचे कोट्यवधी वापरकर्ते जगभरात आहेत. व्हिडिओ कॉल, वॉईस कॉल, डॉक्युमेंट, पेमेंटसारख्या सुविधा व्हॉट्सअपवर सुरू झाल्याने वापरकर्त्यांना इतर ॲप्सची फार कमी गरज लागते.

 

अनेक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आता गुगलची मदत घेतो. आता व्हॉट्सअपने हीच सुविधा मेटा एआयच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. व्हॉट्सअपच्या न्यु चॅट आयकॉनच्यावर मेटा एआयचा आयकॉन आहे. तिथं क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एआयचा चॅटबॉक्स ओपन होतो. या चॅटबॉक्सला तुम्ही कोणतेही प्रश्न विचारले तरी त्याची उत्तरे सेकंदात मिळतात.

 

हे नेमकं वापरायचं कसं?

– व्हॉट्सअप सुरू केलं की न्यू चॅट्सच्या आयकॉनच्या वर मेटा एआयचा आयकॉन आहे.

 

– या आयकॉनवर क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या अटी वाचा आणि मान्य करा. त्यानंतर चॅटबॉट सुरू होईल.

 

– या चॅटबॉटवर तुम्हाला हवा तो प्रश्न, शंका लिहा. लिहून झाल्यानंतर एंटर करा.

– प्रश्न विचारल्यानंतर काहीच सेकंदात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल.

 

फिसर्सचं वैशिष्ट्य 

 

तुम्ही तुमचा चॅट ज्याप्रमाणे डिलिट करता त्याचप्रमाणे एआय चॅटबॉटवर विचारलेला प्रश्न डिलिट करता येणार आहे. मेटाच्या गोपनीयता धोरणाशी सुसंगत एआय चॅट आहे. हे वैशिष्ट्य वापरून तुम्ही मेटाच्या एआय सेवा अटींनी सहमती दर्शवता. एआयद्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूकच असतील असंही नाही. यात केवळ इंग्रजीतून उत्तरे मिळत असली तरीही तुम्ही कोणत्याही भाषेत प्रश्न विचारू शकता. परंतु, तुम्हाला उत्तरे इंग्रजीतूनच उपलब्ध होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.