भोंगळ कारभार.. आरोग्य केंद्रात रात्री उशिरा पर्यंत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया?

0

 

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

साकळी येथील प्राथमिक आरोग्य केद्रांत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करीता दाखल झालेल्या महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रात्री तब्बल नऊ वाजता करण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या ठिसाळ कारभाराबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांकडुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, साकळी येथील प्राथमिक आरोग्य केद्रांत ३ जूलै २०२४ रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कँपचे आयोजन करण्यात आले होते. साकळी प्राथमिक आरोग्य केद्रातील साकळी, मनवेल, वढोदा , पथराडे या गावातील दहा महिला मंगळवारी दाखल झाल्या असून बुधवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होणार म्हणून अन्न पाणी चहा काहीही न घेता उपाशी पोटी तब्बल चोवीस तास होऊनही शस्त्रक्रिया उशिरा होत असल्यामुळे नातेवाईक यांनी चांगलाच गोंधळ केला असून आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभार बद्दल संताप व्यक्त होत आहे.

यावल तालुका वैद्यकिय अधीकारी डॉ. राजू तडवी यांच्याशी लोकशाहीने संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, रात्री उशिरा पर्यत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी उशिर होईल म्हणून आम्ही रुग्णांना सूचना  देण्यासाठी कळविले होते.

पेंशट घरी नेण्यासाठी नातेवाईकांचा संताप

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलांना रात्री नऊ वाजेपर्यंत सर्जन दाखल झाले नसल्यामुळे पेंशट घरी नेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईक यांनी आरडाओरड केली.

कर्मचाऱ्यांची ताराबंड

प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्यालयी राहात नसलेले कर्मचारी देखील रात्री उशिरा पर्यंत दवाखान्यात उपस्थित होते. मात्र मुख्यलयी राहत नसल्यामुळे घरी जाण्यासाठी चांगलीच ताराबंड उडाली.

Leave A Reply

Your email address will not be published.