धुपेश्वर नदीपात्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू

0

बुलढाणा, लोकशाही न्युज नेटवर्क 

जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील श्री क्षेत्र धुपेश्वर येथील पूर्णा नदीपात्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि.13 जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मलकापूर तालुक्यातील श्री क्षेत्र धूपेश्वर येथील पूर्णा नदीपात्रावरील वॉटर सप्लाय येथे ठेकेदारीत मजुरीने काम करणाऱ्या दोन युवकांचे आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास पाण्यात मृतदेह आढळून आले आहे. आज पहाटे सहा वाजेच्य सुमारास ही घटना उघडकीस आली असून नंदकिशोर समाधान धांडे (वय 32, रा. विवरा) व सागर मधुकर कडू (वय  30, रा . विवरा) असे मृतक युवकांची नावे आहेत.

याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दोघांचे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.