जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेतर्फे महीला आत्मनिर्भर अभियानाचा शुभारंभ

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनाबाबत आपल्या मनातील नकारात्मकता बाजूला सारा विविध योजना समजावून घेऊन त्यांच्यासाठी पाठपुरावा करा. जिथे अडवणूक होईल ती अडचण जाहीर मांडा. बचत गट असो वा लहान व्यावसायिक केंद्र सरकार योजनांच्या माध्यमातून आपल्या पाठीशी खंबीर उभे असून महिला भगिनींना आत्मनिर्भर होण्याची ही मोठी सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

आज जळगाव शहर महानगरपालिका जळगाव आयोजित दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला बाल विकास विभाग आयोजित जळगाव जिल्हा आत्मनिर्भर महिला अभियान महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी विविध महागड्या वैद्यकीय तपासणी रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या. सुरुवातीला बचत गटांच्या महिला भगिनींनी लावलेल्या विविध स्टॉलवर जाऊन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी पदार्थांची चव घेत त्यासाठी महिलांनी घेतलेले कष्ट व पाककृती समजावीत महिला भगिनींचा उत्साह वाढविला यावेळी महिला भगिनींना सहकार्य करणारा विविध बँक अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच लहान व्यवसायिकांना पंतप्रधान स्व. निधि वाटप तर बचत गटांना कर्जाची रक्कमेचा धनादेश यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील व मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापालिकेचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली यानंतर उपायुक्त गणेश चाटे यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा सादर केला. महापौर जयश्रीताई महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी महापौर सिमा भोळे,भाजप महानगराध्यक्ष दीपकदादा सूर्यवंशी, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, महानगर महिला अध्यक्ष दिप्तीताई चिरमाडे ,ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, केशव स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कृषीतज्ञ अनिलजी भोकरे, कृषी उपसंचालक कुर्बान तडवी, तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव राऊत, पि एम एफ एम ई संसाधन व्यक्ती समाधान पाटील, सरकारी वकील ऍड.अनुराधा वाणी, एन यू एल एम प्रमुख लहासे, मनपा स्थायी समितीचे सभापती सूचीता हाडा, माजी सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेविका दीपमाला काळे, नगरसेविका गायत्री राणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.