भारतीय सैन्याच्या रणगाड्याचा मोठा अपघात, 5 जवान शहीद

0

 

लडाख, लोकशाही न्युज नेटवर्क

युद्ध सुराव सुरु असताना रणगाडे नदी पार करताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यात रणगाड्यामधील जवान अडकले. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाल्याची घटना लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात शुक्रवारी घडली.

 

रणगाडा गेला वाहून 

शुक्रवारी दौलत बेग ओल्डी भागात रणगाड्यांचा अभ्यास सुरु होता. सैन्याचे अनेक टँक्स इथे आहेत. रणगाडे बोधी नदीपार कसे नेले जातात, याचा अभ्यास सुरु होता. एक टँक नदी पार करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक नदीचा प्रवाह गतीमान झाला. त्यात रणगाडा वाहून गेला. या रणगाड्यात 4 ते 5 जवान होते. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

 

रशियन बनावटीचा रणगाडा

नदीच्या प्रवाहात T-72 रणगाडा वाहून गेला. हा रशियन बनावटीचा रणगाडा आहे. ज्यूनियर कमिशनड ऑफिसरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अन्य चौघांचा शोध सुरु आहे. मंदिर मोर्हजवळ रात्री 1 च्या सुमारास अचानक पाणी पातळी वाढली.

दुर्देवी घटना: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाख दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं. नदी पार टँक नेताना ही दुर्देवी घटना घडली. आम्ही वीर जवानांची सेवा कधीच विसरणार नाही असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.