Jio आणि Airtel च्या ग्राहकांना मोठा धक्का

खिशाला लागणार कात्री

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

वाढत्या महागाईच्या काळात आता Jio आणि Airtel च्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. रिलायन्स जिओ आणि एयरटेलने त्यांच्या प्रिपेड प्लॅन्सच्या किंमतीमध्ये जवळपास १२ ते २५% वाढ केली आहे. या किंमती वाढल्या असल्या तरी या प्लॅन्समध्ये मिळणारा डेटा आणि व्हॅलिडिटी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

दोन्ही कंपन्यांचे प्लॅन्स ३ जुलै २०२४ पासून लागू होतील. प्रिपेडसोबत काही पोस्टपेड प्लॅन्सच्याही किंमती वाढवल्या आहेत.

नेटवर्क टेक्नॉलजी आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक यानुसार एक यशस्वी बिझनेस मॉडेल सुरू ठेवण्यासाठी आम्हाला हे बदल करावे लागत आहेत असं एयरटेलने सांगितलं आहे.

जिओचे सर्व नवे प्लॅन्स

 

एयरटेलनेचे सर्व नवे प्लॅन्स

तुम्हाला जर फक्त कॉलिंगसाठी प्लॅन्स हवे असतील तर ते आता उपलब्ध नाहीतच. तुम्हाला इंटरनेट डेटा असलेलेच प्लॅन्स घ्यावे लागतात. ज्यांचा तसा काहीच वापर नाही त्यांनासुद्धा असे जास्त किंमतीचे रीचार्ज करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.