समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर

0

 

जालना, लोकशाही न्युज नेटवर्क 

जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाल्याची घटना जालना जिल्ह्यातून समोर आलीय. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समृद्धी महामार्गावरील कडवंची जवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीगा कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा पूर्णपुणे चुराडा झाला आहे.

रात्री अकराच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रं. MH.12.MF.1856 मध्ये डिझेल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कार क्रं. MH.47.BP .5478 ला जोरदार धडक दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.