बैलावरुन राडा, बारामतीत गोळीबार

0

 

बारामती

बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून एकाच्या डोक्यात गोळी झाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेने बारामती व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवार २७  जून रोजी रात्री अकराच्या सुमारास बारामती तालुक्यातील निंबुत येथे ही घटना घडली. सदर घटनेत रणजित निंबाळकर (रा. मु.पो तावडी ता.फलटण जि. सातारा सध्या (रा. स्वामी विवेकानंद नगर, फलटण ता. फलटण जि. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंकिता रणजित निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे (दोघे रा. निंबुत ता.बारामती जि.पुणे ) आणि तीन अनोळखी अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बैल ३७  लाख रुपयांना विकला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गौतम काकडे यांना फिर्यादीचे पती रणजीत निंबाळकर यांनी सुंदर नावाचा बैल ३७ लाख रुपयांना विकला होता, त्यापैकी पाच लाख रुपये विसार म्हणून दिले होते. उर्वरित रक्कम २७ जून रोजी नेण्यासाठी बारामती तालुक्यातील निंबूत येथे त्यांच्या घरी बोलवले होते. त्यानुसार रात्री अकराच्या सुमारास रणजीत निंबाळकर फिर्यादी अंकिता निंबाळकर व त्यांची दहा महिन्यांची मुलगी अंकुरण हे निंबुत येथे गौतम काकडे यांच्याकडे गेले होते. काकडे यांनी माझ्या पतीस जीवे मारण्याच्या उद्देशाने बोलवले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुणे जिल्ह्यात अप्रिय घटना सातत्याने घडत असून पोलिसांचा वचक संपल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.