डिजिटल पेमेंटच्या दुनियेत अदानी समूह करणार एंट्री

0

नवी दिल्ली ;- फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, पेटीएम आणि गुगल पे यांसारख्या UPI कंपन्यांचे मार्केट वाढले असतांना अशातच आता अदानी समूह इ कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

एका वृत्तानुसार, अदानी ग्रुपला मान्यता मिळाली तर अदानी ॲपद्वारे बऱ्याच सुविधा प्रदान करण्यात येतील. अदानीचे ॲप २०२२ मध्ये लॉन्च झाले होते. सध्या या ॲपद्वारे तिकीट बुकिंग, हॉटेल बुकिंग यासह गॅस, वीज बिल भरण्याची सुविधा प्रदान केली जात आहे. (Adani Group) यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि डिजिटल पेमेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर, कंपनीचे प्रारंभिक लक्ष हे ग्राहकांच्या सुविधा असणार आहे. त्यामुळे या ॲपद्वारे ग्राहक विविध प्रकारचे पेमेंट्स करू शकतील. जे करताना त्यांना लॉयल्टी पॉइंट्स दिले जातील आणि याचा वापर ते ऑनलाइन शॉपिंगमध्ये करू शकतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.