रिल्सच्या नादात कार थेट दरीत कोसळली; 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

0

छ. संभाजीनगर, लोकशाही न्युज नेटवर्क

आजकाल रिलच्या नादात काहीही स्टंटबाजी करतात. मात्र यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलीय. तरुणीला कारमध्ये बसून रिल्स बनवणं महागात पडलं.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ हा भयानक अपघात घडला. कार चालवायला नवीन असलेली तरुणी कार चालवत असताना रील बनवत होती. रिल बनवताना तिनं गाडी पुढे नेण्याच्या ऐवजी मागे नेली आणि तिथेच ती दरीत कोसळल्याने 23 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झालाय. श्वेता दीपक सुरवसे असं या तरुणीचं नाव आहे.

ही तरुणी आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे हे दोघेही संभाजीनगर येथून कारने दत्त मंदिर परिसरात आले होते. या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवताना तिने तिच्या मित्राला सांगितले की मी पण कार चालून बघते मात्र ही तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिनं का पुढे नेण्याऐवजी कारचा रिव्हर्स गिअर टाकला आणि ही कार थेट दरीत कोसळली.

Leave A Reply

Your email address will not be published.