भडगाव महसूल विभागाने पकडले 6 ब्रास अवैध वाळूने भरलेले डंपर

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातील व शहरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असून या बाबत भडगाव नायब तहसिलदार रमेश देवकर, तलाठी राहुल पवार यांच्या पथकाने काल मध्यरात्री तालुक्यातील गिरड गिरणा नदी पात्रातून सहा ब्रास अवैध वाळू भरलेला दहा टायरी डंपर पकडला. यावेळी नायबतहसिलदार रमेश देवकर, तलाठी राहूल पवार, तलाठी अविनाश जंजाळे, तलाठी व्ही.सी.पाटील, तलाठी व्ही पी शिंदे, वाहनचालक लोकेश वाघ, पोलीस कॉन्सटेबल राजेंद्र पाटील, तात्याबा नागरे, आदींचे पथक होते. सदरचे डंपर हे भडगाव शासकीय विश्राम गृह येथे जमा करण्यात आले असून यावर दंडात्मक कारवाई करून आर. टी. ओ. कडे वर्ग करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.