परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळामार्फत गुणवंत विदयार्थ्यांसह समाजबांधवांचा गुणगौरव

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव येथे परदेशी, राजपुत उन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गुणवंत विदयार्थी, विदयार्थीनी, तसेच विविध क्षेञात यश मिळविलेल्या समाजबांधवांचे मान्यवरांच्या हस्ते गौरव करुन सत्कार करण्यात आला. संचालक मंडळासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विदयार्थ्यांसह समाजबांधवांना प्रमाणपञ, ट्राॅफी, गुलाबपुष्प देउन सत्कार करण्यात आला.

विदयार्थ्यांनी खचुन न जाता जोमाने अभ्यासाची तयारी करावी. वेगवेगळया क्षेञात करीअर घडवावे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर या क्षेञात झोकुन दयावे. हिम्मत, जिद्द, चिकाटी ठेवल्यास यश जरुर मिळेल. मराठवाडा विदयापिठाचे सिनेट सदस्य प्रा. डाॅ. भगवानसिंग डोभाळ, सेवानिवृत्त प्रा. डाॅ. करुणा संतोष परदेशी बांबरुड प्र. ब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयसिंग राजपुत बहाळ, संचालक सुभाष महाजन, परदेशी राजपुत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी, इंजिनियर बी. बी. राजपुत यांचेसह मान्यवरांनी मौलीक मार्गदर्शन केले. तसेच संचालक मंडळासह मान्यवरांनी गुणवंत विदयार्थ्यांसह विविध क्षेञात यश मिळविलेल्या समाजबांधवांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. हा कार्यक्रम चाळीसगाव येथे लक्ष्मीनगर भागातील राजपुत मंगल कार्यालयात दि. ६ रोजी रविवारी दुपारी १२ वाजता आयोजीत करण्यात आला होता.

या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सुयश संपादित केलेले विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा दहावी व बारावीतील गुणवंत विदयार्थी, विदयार्थीनी, विविध क्षेञात यश प्राप्त केलेल्या समाजबांधवांचा यावेळी प्रामुख्याने सत्कार करण्यात आला. यात जळगाव प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी सचीन परदेशी, वाडे येथील रहिवाशी व जि. प . चे मुख्याध्यापक शरद परदेशी, बहाळचे रहिवाशी व जि. प. चे मुख्याध्यापक प्रेमसिंग परदेशी, पळाशी येथील रहिवाशी व जि. प. चे मुख्याध्यापक सुभाष परदेशी यांची मुख्याध्यापक पदोन्नती, सावदयाचे रहिवाशी व औरंगाबादचे उदयोजक भगवानसिंग परदेशी, वाडे येथील रहिवाशी व लोहारा विदयालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र बडजावत, संस्थेचे खजिनदार सतीष परदेशी लोहटार, संचालक सुरेश परदेशी भडगाव. यांचेसह मान्यवरांचाही संचालक मंडळामार्फत विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नागद येथील समाजसेवक तसेच चाळीसगाव येथील साईराज आर्केस्टाचे संचालक विनोदसिंग गोपालसिंग परदेशी यांनी सुञसंचालनात आपल्या सुंदर आवाजात गुणवंत विदयार्थ्यांना प्रेरणादाई शेरशायरी, मौलीक मागदर्शनाचे धडे दिल्याने विदयार्थ्यांना प्रेरणा मिळुन हा गुणगौरव सोहळयाला आगळा वेगळा रंग भरल्याचे दिसुन आले.

त्यानंतर पीसआय सविता परदेशी घुसर्डी खुर्द, व पी.एस.आय विदया रुमसिंग परदेशी वडजी, तसेच डाॅ. आसावरी बादलसिंग परदेशी भडगाव, तसेच सी. ए झालेल्या तेजस्वी राजपुत नागद, आदित्य परदेशी वडजी या गुणवंत विदयार्थी व विदयार्थीनी अभ्यास कसा केला. यश कसे मिळविले. आई, वडीलांचा, शिक्षकांचे कशी वेळोवेळी मदत व मौलीक मार्गदर्शन आपले असे सुंदर मनोगत व्यक्त केले. व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कष्टाची कदर करून मेहनत करावी. अपयशाने खचून जाऊ नये असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कर्तारसिंग परदेशी यांनी मांडले .व ताळेबंद अहवाल संचालक सतीश परदेशी यांनी वाचन केला. संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे नवनियुक्त संचालकांची निवड करण्यात आली. संचालकांच्या निवडीचा प्रस्ताव सुरेश कोंडु परदेशी यांनी मांडला. त्यास संस्थेचे संचालक सुभाष महाजन यांनी अनुमोदन दिले. नवनियुक्त संचालक म्हणून भगवानसिंग महेर जामडी, पञकार अशोक परदेशी वाडे, मथुराबाई भगवान लोदवाळ यांची निवड करण्यात आली व त्यांचा निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. कर्तारसिंग परदेशी यांचेसह संचालक मंडळामार्फत सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतातुन संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ यांनी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व समाजातील दानशुर व्यक्तींना संस्थेस आर्थिक मदतीचे आवाहनही केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ, कार्याध्यक्ष डाॅ. कर्तारसिंग परदेशी, खजिनदार सतीश परदेशी लोहटार, संचालक सुभाष महाजन नागद, सुरेश परदेशी भडगाव, डॉ जयसिंग परदेशी टेकवाडे खुर्द, डाॅ. सुशीला कर्तारसिंग परदेशी, सचिव निलेश राजपुत आदी संचालक व सभासद, समाजबांधव, महिला, विदयार्थी, विदयार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व उपस्थितांचे आभार संस्थेचे खजिनदार सतीश परदेशी यांनी मानले. समाजबांधवांनी कार्यक्रम यशस्विततेसाठी अनमोल परीश्रम घेतले. सुरुवातीला संस्थेंचे उपाध्यक्ष कै. देवचंद दलिचंद परदेशी नावरे, कै. कु. कल्याणी पाटील गोंडगाव चिमुकली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.