बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर मुलाच्या डोळ्यादेखत अत्याचार

0

सटाणा ;- एक महिला मजुरीचे काम संपवून रात्री सटाणा येथून आपल्या मुलासह घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र, वाटेतच तिच्यासोबत भयानक घडले. रात्री गावी जाणारी बस सुटली आणि महिला खासगी वाहनाची वाट पाहात बसली होती. रात्री आठ वाजताच्या सुमारास ती आपल्या मुलासह वाहनाची वाट पाहात थांबली होती. वाहन मिळाले नाही मात्र तिच्यासोबत दोघांनी अतिशय धक्कादायक कृत्य केले.पोलिसांनी काही वेळातच नीलेश सतीश निकम (वय ३२) आणि स्वप्निल शिवाजी वाघ (वय २६) या दोन संशयितांना जेरबंद केले.

पीडित महिला तिच्या मुलासह सटाणा येथील कांदा व्यापाऱ्याकडे मजुरीसाठी गेली होती. मजुरीकाम संपल्याने ती व मुलगा सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सटाणा येथून घरी जाण्यास निघाले.आजच्या सर्व नवीन बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा रात्री ८ वाजता पिंपळनेर येथून त्यांना गावी जाण्यासाठी बस नसल्याने वाहनाची वाट पाहत ते थांबले होते.रात्री ११ वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली.यातील चालक आणि एका व्यक्तीने महिलेची विचारपूस करत तिला ओढत बैल मार्केटमधील ओट्यावर नेले. तिथेच दोघांनी तिच्या मुलादेखत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.

तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर वाहनासह पळ काढला. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३७६ सह अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ कलम ३ (१) फ याप्रमाणे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.