रशियात बुडालेल्या अमळनेरच्या भावंडांवर अंत्यसंस्कार 

अखेर दहा दिवसांनी भावंडांचे पार्थिव दाखल : मोठ्या जनसमुदायात अखेरचा निरोप 

0

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क 

रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा 4 जून रोजी वोलखोव्ह नदीत बुडून मृत्यू झाला होता. दहा दिवसांनी या मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतातील त्यांच्या मूळगावी दाखल झालेत. त्यापैकी अमळनेर शहरातील दोघा भावंडांवर मुस्लिम रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. या विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. शहरातील जिया व जिशान पिंजारी या आते हो मामे भावंडांचा समावेश होता.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय उसळला होता. या घटनेने समाजमन देखील सुन्न झाले होते. अमळनेर येथील अंत्ययात्रेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील सहभाग घेऊन मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यारोस्लाव-द-वाइज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी सोमवारी न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली होती. मॉस्कोहून विमानाने दुबईमार्गे मुंबईला चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह आणले.

सुरुवातीला चौघा विद्यार्थ्यांचे मृतदेह दिल्लीत आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दिल्लीहून पुन्हा छत्रपती संभाजीनगर व मुंबईला आणण्यासाठी वेळ लागला असता. त्यामुळे मुंबईपर्यंत विद्यार्थ्यांचे मृतदेह पाठविण्याचा प्रस्ताव रशियातील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना दिला. दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांचे मृतदेह मॉस्कोवरून दुबई मार्गे मुंबईला आणण्यात आले तेथून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.