अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला १० वर्षांची शिक्षा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आज (दि. ३१) रोजी धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने एका आरोपीला १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ११ मार्च २०१९ कालावधीत ही घटना घडली होती. आज या प्रकरणाचा न्यायालयाने निकाल दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधत आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्या अनुषंगाने धुळे जिल्हा पाेलिस दलाने संबंधितावर गुन्हा नोंदविला.

या प्रारणाचा पोलिसांनी कसून तपास केला. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. न्यायालयात देखील त्यांनी त्यांची प्रखर भूमिका नोंदवली. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत संपूर्ण कारवाई झाली. या आरोपीस पोक्सो कायदा अन्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे. धुळे सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ३५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.