Bajaj Platina 100 ES भारतात लॉन्च ; 53 हजारात घरी न्या शानदार बाईक

0

मुंबई : देशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने मंगळवारी त्यांची लोकप्रिय बाइक प्लॅटिना 100 इलेक्ट्रिक स्टार्ट (ES) ची नवीन आवृत्ती बाजारात आणली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत या बाईकची एक्स शोरूम किंमत 53,920 रुपये ठेवण्यात आली आहे.

बजाज ऑटोने ही बाइक स्प्रिंग-इन-स्प्रिंग सस्पेन्शनसह सादर केली आहे जी लांबच्या प्रवासादरम्यान अधिक आराम देते आणि रायडर तसेच त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशासाठीदेखील सोयीस्कर आहे. यात ट्यूबलेस टायर्सही देण्यात आले आहेत, जे सुरक्षित आणि हॅसल-फ्री रायडिंगसाठी अतिशय उपयुक्त आहेत.

कंपनीचे मार्केटिंग प्रमुख नारायण सुंदरमण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्लॅटिना हा एक असा ब्रँड आहे ज्या ब्रँडकडे 7 मिलियनहून (70 कोटी) अधिक समाधानी ग्राहक आहेत, त्यामुळेच या सेगमेंटमध्ये प्लॅटिना हा एक चांगला पर्याय आहे. ते पुढे म्हणाले की नवीन प्लॅटिना 100 ईएस ही ग्राउंड ब्रेकिंग किंमतीत चांगली ऑफर देत आहे जी किक-स्टार्ट रायडर्सना सेल्फ-स्टार्टमध्ये अपग्रेड करण्याचा पर्याय देते.

या बाईकमध्ये तुम्हाला 102 सीसी फोर स्ट्रोक सिंगल सिलिंडर SOHC एअर कूल्ड इंजिन मिळेल जे 7,500 आरपीएम वर जास्तीत जास्त 7.9 पीएस आणि 5,500 आरपीएम वर 8.34 एनएम पीक टॉर्क जनरेट करेल. यासह, तुम्हाला फोर-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन युनिट मिळेल.

या बाईकच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये बेटर व्हिजिबिलिटी आणि ओव्हरऑल लुकसाठी रीअरव्ह्यू मिरर देण्यात आला आहे. ही बाईक कॉकटेल वाइन रेड आणि सिल्व्हर डिकल्ससह इबोनी ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आली आहे. ही बाईक भारतातील सर्व अधिकृत बजाज ऑटो डीलरशिपमधून खरेदी केली जाऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.