शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांचे पार्थिव पिंपळगावात दाखल

0

नागरिक आणि कुटुंबीयांनी घेतले दर्शन

व्हिडीओ फक्त लोकशाही वर


चाळीसगाव:-(प्रतिनिधी )
पिंपळगाव येथील शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर आज दि.२८ नोव्हेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहे. अवघ्या २१ व्या वर्षी यश देशमुख यांना वीरगती प्राप्त झाल्याने पूर्ण गाव शोकमग्न असून पिंपळगाव गावाजवळ असलेल्या मोकळ्या माळरानावर हा अंत्यविधी होत आहे.

शहीद यश देशमुख यांचे पार्थिव पिंपळगावात नासिक येथून आज सकाळी आणण्यात आले असून समस्त गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी अंतिम दर्शन घेतले

ग्रामस्थांतर्फे अग्नीडाग देण्यासाठी ओटा तयार करण्यात आला आहे. अंत्यविधी करण्यात येणार असणाऱ्या परिसरात देशभक्तीपर संदेश असणारी रांगोळी व फुलांची आरास ही आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्या शिवनेरी फाउंडेशन मार्फत करण्यात आली. स्वतः प्रतिभाताई चव्हाण यांनी रांगोळी व फुलांची आरास काढत वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.