नियमबाह्य दुकान उघडणाऱ्यावर दंडात्मक कारवाही

0

वरणगाव : कोरोना विषाणु आजारावर मात करण्यासाठी शासनाने लागु केलेल्या संचार बंदी व जिल्हाधिकारी यांनी नव्याने दिलेल्या आदेशानुसार शहरात विनाकारण फिरणारे नागरिक व नियमबाह्य दुकान उघडणाऱ्यावर नगरपरिषदेने दंडात्मक कारवाही केली.

शासनाने कोरोना या आजावर प्रतिबंधात्मक करण्यासाठी शासनाने आधीच संचार बंदी लागु केली असली तरीही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकानवर पोलीस प्रशासना कडून कारवाही करीत आहे. मात्र, तरीही काही हैशी नागरिक विना कारण मोटरसायकली घेऊन रस्त्यावर फिरत आहे व संचार बंदीचे उलघन होत असल्यान पोलीसान कडून दंडात्मक कारवाही होत आहे मात्र दि १५ एप्रील पासुन शासनाने व जिल्हाधिकारी यांनी नव्याने दुकानदारासाठी नियमावली लागू केल्याने नगर परिषद प्रशासनाने शहरातील काही दुकानादाराने नियमबाह्य दुकान सुरू ठेवणाऱ्या पंधरा दुकानदारावर दंडात्मक कारवाही केली तर आजपासुन विनाकारान घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकावर पोलीसाना कडून कारवाही करण्यात येणार असून नागरिकानी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे व विना कारण घराबाहेर न फिरण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासन व पोलीसान कडून करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.