दहावीच्या परीक्षेत वटकळी येथील रोहिणी शिंदे 95 टक्के गुणांनी उत्तीर्ण…

0

 

हिंगोली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील रहिवासी असलेली व अक्षर ज्योती माध्यमिक विद्यालय परभणी येथील विद्यार्थीनी कु. रोहिणी गुलाबराव शिंदे हिने 95.00 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
रोहिणी ही प्राथमिक आरोग्य केंद्र कवठा येथील डॉ गुलाबराव शिंदे यांची कन्या असून तिला मराठीत 94, संस्कृतमध्ये 98, इंग्रजीत 94, गणितात 88, सायन्स अँड टेक्नॉलॉजीत 94, सोशल सायन्स 85 या विषयात याप्रमाणे 500 पैकी 475 गुण मिळवले असून, तिची टक्केवारी 95.00 एवढी आली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, सर्व गुरुजन वर्ग यांना दिले आहे. तिच्या या मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.