६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘भोंगा’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

0

नवी दिल्ली : नवी दिल्लीत ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात भोंगा या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून अंधाधूनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर ‘उरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘नाळ’ या मराठी चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाळ’ याच चित्रपटासाठी सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता स्वानंद किरकिरे याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या(चुंबक) पुरस्कारावर नाव कोरले आहे.

जाहीर झालेले राष्ट्रीय पुरस्कार-

सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधून

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी

सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट- केजीएफ

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा

पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो

सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन

पर्यावर संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)

सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)

सर्वोत्कृष्ट संवाद- बंगाली चित्रपट तारीख

सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधून

Leave A Reply

Your email address will not be published.