१० रुपयात जेवण तर एक रूपयात आरोग्य चाचणी : शिवसेनेचा वचननामा जाहीर

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा विधानसभा निवडणूकपूर्व ‘वचननामा’ आज (12 ऑक्टोबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित झाला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते हजर होते. या वचननाम्यात मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पडला आहे. “राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा आम्ही बनवलेला आहे, पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा आखलेला आहे. यातलं एकही वचन खोटं ठरणारं नाही. “दुर्बल घटक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष १०००० रुपये देणार, हे सगळं करताना अत्यंत जबाबदारीने विचार केलेला आहे,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “हा वचननामा बनवताना ५ वर्षांचा आपला जो काही फिरण्याचा अनुभव, लोकांशी चर्चा आणि लाखो लोकांचे प्रश्न घेऊन जन आशीर्वाद यात्रेत आणि दुष्काळी दौऱ्यात लोकांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांचे एकत्रीकरण आणि संकलन करून वचननामा बनवलेला आहे,” असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. वचननाम्यातील महत्वाचे मुद्दे – प्रत्येक जिल्ह्यात 10 रुपयांत थाळी देणारे कॅन्टीन उभारणार – 1000 भोजनालयं बनवणार त्यात 10 रुपयांत उत्तम भोजन – शेतकऱ्यांसाठी दरवर्षी दहा हजार रूपयांची योजना – एका रुपयात 200 पेक्षा अधिक आजारांवर आरोग्य चाचणी – आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना – 15 लाख पदवीधर युवकांना ‘युवा सरकार फेले अंतर्गत शिष्यवृत्तीची संधी देणार – शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार – प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार – ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अनेक योजना – घरगुती वीजदर कमी 30 टक्क्यांपर्यंत कमी करणार – शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार – ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेसची सोय – तीर्थक्षेत्रांच्या प्रवासासाठी विशेष समन्वय केंद्रांची स्थापना – पीकविमा योजनेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची सोय करणार – पाच वर्षासाठी खतांचे भाव स्थिर ठेवणार

Leave A Reply

Your email address will not be published.