हरताळा येथे हनुमान मंदिर व दत्त मंदिराच्या जागेचे भूमिपूजन

0

हरताळा : आज होळी व पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हरताळा फाटा येथील जागृत हनुमान मंदिराचे जागेचे व कृषी विद्यापीठ येथे दत्त मंदिर जागेचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी हनुमान मंदिर व दत्त मंदिर पूजेचा मान माजी सभापती आनंदराव देशमुख व रा कॉ जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे यांना दिला.याप्रसंगी आमदार साहेबांनी अभियंता यांना मंदिर आकर्षक बनविण्यासाठी सूचना केल्या.भूमिपूजन प्रसंगी प पु शिवनारायन गिरी महाराज,प पु आझादगिरी महाराज,वरणगाव नगरपालिका चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोसावी साहेब,कृषी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल प्रा सुदाम पाटील,माजी सभापती आनंदराव देशमुख,ईश्वर रहाणे,सुनील पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख,शिवसेना माजी उप जिल्हा प्रमूख गोपाळ सोनवणे,रामदास मुलांडे, प्रा सीताराम चवरे,किसन चव्हाण,बाळू भागवत,अशोक पाटील चांगदेव,अतुल पाटील सरपंच चांगदेव, गोपाळ उदळकर,प्रशांत शेळके, भागवत धबाडे,मधुकर काळे,श्रीधर चौधरी,जीवराम कोळी वढवे,सुभाष माळी उपसरपंच पिप्रि आकारूत, वसंत भलभले नगरसेवक,वनील कोळी,उमेश शेळके व कृषी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी तसेच हरताळे येथील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सोपान दांडगे व प्रदीप काळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.