स्वबळावरच निवडणूक जिंका ; प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी

0

वरणगाव  : आगामी नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुका ह्या स्वंबळावर भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढून सत्ता स्थापन करण्याचे आव्हाण भाजपा मुख्यप्रवक्ते माधव भंडारी यांनी केले आहे.

मुक्ताईनगर कडून नाशिक कडे प्रवास करीत असताना  भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष  यांच्या संपर्क कार्यालयास प्रदेश उपाध्यक्ष व मुख्यप्रवक्ते माधव भंडारी यांनी भेट दिली होती. त्यांच्या सोबत महेश जोशी व गिरीश नारखेडे हे होते.

यावेळी त्यांनी प्रमुख्य कार्यकर्त्याशी हितगुज करीत असताना आगामी होणाऱ्या नगर परिषद मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी शहरात केलेल्या विकास कामाच्या जोरावर येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर व स्वबळावर  पुर्ण ताकदीने निवडणुक लढवावी पुन्हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवा असे आव्हाण त्यांनी केले.

या प्रसंगी  सुनिल काळे यांनी प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे  शाल श्रीफळ पुष्पगुच्छा देऊन सत्कार करण्यात येऊन त्यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी  सुनिल माळी, अल्लाउद्दीन शेठ, श्यामराव धनगर, आकाश निमकर, ज्ञानेश्वर भोई, मिलीद भैसे, गोलू. राणे, हितेश भंगाळे आदीसह भाजपाचे कार्यकार्त्र्ये उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.