सोशल मीडियावर “भावपूर्ण श्रद्धांजली” चा महापूर

0

 अमळनेर(प्रतिनिधी) :   कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे.जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा या भागात तर परिस्थिती जास्तच बिकट बनत चालली आहे.

अमळनेर मध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करतांना दिसून येत आहे,कोरोना चाचण्यांचा वेग वाढवला जातोय मात्र दुसरीकडे दवाखाने हाऊसफुल्ल झालेत.पेशंट ला वेळेवर बेड भेटत नाहीयेत.हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन ची कमतरता भासत आहे.

मागील काही दिवसात मृत्युदर वाढला आहे हे मात्र नक्की.सोशल मीडियावर एकच संदेश जास्त फिरतांना दिसून येतोय तो म्हणजे “भावपूर्ण श्रद्धांजली”.यात कोरोनाने बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.यातच हृदविकाराच्या घटनांमध्ये देखील वृद्धी झालेली पाहायला मिळत आहे.स्मशानभूमीमध्ये नंबर लावावे लागत आहेत.सरकारी आकडे जरी कमी जास्त असतील,मात्र स्मशानभूमीतील चित्र बोलके आहे.२९ मार्च रोजी एकाच दिवशी शहरातील ताडेपुरा स्मशानभूमीत सायंकाळपर्यंत १५ प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते.

प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत.नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेणे महत्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.