सी.ए.जळगाव शाखेतर्फे जीएसटी, ई-वे बील कार्यशाळा

0

जळगाव ;- जळगाव सी.ए. शाखेतर्फे आयसीएआय भवन येथे जीएसटीचा रियल इस्टेट क्षेत्रावरील परिणाम व आयकरमधील कायदेशीर समस्या या विषयावर वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील डब्ल्यूआयआरसीचे सेन्ट्रल कौन्सिल मेंबर, आयसीएआय डायरेक्ट टॅक्स कमेटीचे अध्यक्ष सी.ए. तरुण घिया, सी.ए. जनक वाघानी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष सी.ए. अजय जैन, सचिव सी.ए. सागर पाटणी, सी.ए. भूषण गादिया,जळगाव कॉन्ट्रॅक्टर असोसीएशनचे सचिव आर.जी.पाटील उपस्थित होते.

कार्यशाळेत सी.ए. जनक वाघानी यांनी जीएसटीचा रियल इस्टेट क्षेत्रावरील परिणाम व त्यातील समस्या या विषयावर उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रश्‍न-उत्तरांच्या तासात उपस्थित सदस्यांच्या प्रश्‍नांचे समाधान सी.ए. जनक वाघानी यांनी केले. तसेच दुसर्‍या सत्रात सी.ए. तरुण घिया यांनी रियल इस्टेटमधील कायदेशीर तसेच कर समस्या व नोटबंदीमधील कर समस्या या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेस सी.ए. सदस्यांची लक्षणीय उपस्थितीती होती.

सूत्रसंचालन सी.ए. भूषण गादिया यांनी तर सी. ए. सागर पाटणी यांनी आभार मानले. यशस्वितेकरीता जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष सी.ए. अजय जैन, सचिव सी.ए सागर पाटणी, उपाध्याक्षा सी.ए स्मिता बाफना, सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.