सीसीटीव्ही कॅमेरा लावणं इस्लामविरोधी

0

दारुल उलूम देवबंदचा फतवा
सहारनपूर: -फतवे काढून नेहमी चर्चेत असणाऱ्या दारुल उलूम देवबंदने आता नवा फतवा काढला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा लावणं इस्लामविरोधी आहे, असं दारुल उलूमच्या धर्मगुरूंचं म्हणणं आहे. या फतव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका मुस्लीम कुटुंबीयांनी दारुलच्या धर्मगुरूंना विचारलेल्या प्रश्नावर सीसीटीव्ही लावणं इस्लामविरोधी असल्याचं त्यांनी सांगितलं.

अब्दुल्ला माजिद या व्यावसायिकाने दारुल उलूमला पत्र लिहिलं होतं. माझ्या दुकानात मी सीसीटीव्ही कॅमेरा लावला तर चालेल का? असा प्रश्न त्यात विचारला होता. दारुलच्या तीन धर्मगुरूंनी त्यास नकार दिला. सीसीटीव्ही कॅमेरा लावणं इस्लामविरोधी आहे. असं करणं आपल्या धर्मात निषिद्ध असल्याचं उत्तर त्यांनी व्यावसायिकाला दिलं. आपले घर, दुकानाच्या सुरक्षेसाठी इतरही काही मार्ग आहेत. त्यांचा अवलंब करावा. व्हिडिओ रेकॉर्ड करणं किंवा फोटो टिपणं हे इस्लाम धर्मात अमान्य आहे. त्यामुळे मुस्लीम कुटुंब सीसीटीव्ही कॅमेरा लावू शकत नाही, असं दारुलच्या धर्मगुरूंनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.