सार्वजनिक बांधकाम विभाग व माऊली फाउंडेशनच्या वतीने भडगावात वृक्षारोपण अभियान

0

भडगाव (प्रतिनिधी) : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भडगाव उपविभाग व माऊली फाउंडेशन या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भडगाव-एरंडोल रस्त्यावर सुमारे १३०० झाडे लावण्यात येत आहे.गेल्यावर्षी भडगाव-एरंडोल रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने अनेक झाडे कापली गेली. त्यामुळे यंदा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यासाठी वृक्षारोपण अभियान हाती घेण्यात आले आहे. नुकतंच या अभियानाचा शुभारंभ अभियंता श्री,जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, जाकीर कुरेशी, वैशाली पाटील, मनीषा पाटील, सुजीत दुडे उपस्थित होते. अभियंता प्रशांत राजपूत फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील महाजन, देवेंद्र पाटील, चुनीलाल पटेल, हेमंत खैरनार,अनिल दुसाने, प्रतिभा कुळकर्णी, रविंद्र कुळकणी, वैशाली पारील व योगेश शिंपी, संदीप नरवाडे वृक्षारोपणासाठी परिश्रम घेत आहेत.
पावसाळ्यात लावलेल्या या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी फाउंडेशनने घेतली असून या कामी परिसरातील नागरिकांनी , शेतकरी बंधूनीही सहकार्य करावे, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.