सार्वजनिक ठिकाणी तंबाखू बंदी बद्दल जन जागृती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

0

अहमदपुर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तंबाखू बंदी बद्दल जन जागृती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमतंबाखू बंदी बद्दल जन जागृती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम लातूर शहरात विविड कार्यक्रम राबवत आहे . तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन आरोगयास हानिकारक आहे

सार्वजनिक ठिकाणी असे पदार्थ खावून थुकणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे साठीचे रोग पासरण्याचा धोका खूप प्रमाणात वाढतो , या बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य विभाग या साठी सातत्याने कार्य करत असते . तसेच सामाजिक संस्था अससे कार्य करण्यासाठी तत्पर असतात. लातूर शहरात सार्वजनिक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यासाठी जाणीव जागृती चे काम मराठवाडा ग्रामीण विकास संस्था मोठ्या प्रमाणात करत आहे . शहरातील शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणे, कार्यालये, बाजारपेठ, बस स्थानक परिसरात तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ विक्री व वापरावर बंदी असल्याचे फलक लावणे व त्या संदर्भात जाणीव जागृती करणेचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी व कार्यालय परिसराची प्रवेशद्वारावर जमिनीवर प्रतिबंधात्मक सूचना पेंट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद व जिल्हा तंबाकू नियंत्रण कक्ष लातूर यांचे सहकार्याने हे काम शहरातील प्रमुख ठिकाणी करण्यात येत आहे . आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनी या बाबत मार्गदर्शक सूचना या पूर्वीच प्रसिद्ध केली आहे . त्या नुसार सर्व सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वापर सेवन व विक्रीवर या आधीच बंदी चे आदेश जारी करण्यात आले आहेत . मात्र यावर अमलबजावणी होताना दिसत नाही . या संदर्भात सार्वजनिक ठिकाणी व्यवरणान्यांची जाणीव जागृती होण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहे . मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद ही संस्था महाराष्ट्रात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात विविध जिल्ह्यात वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे . जबाबदार घटकांच्या कार्यशाळा , महितीसत्रं अमलबजावणी जाणीव जागृती असे विविध कार्य करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी . बस स्टैंड परिसर , नगर पालिका कार्यालय , पंचायत समिति कार्यालय, जी एस टी भवन , तहसील कार्यालय , वीज वितरण कार्यालय , आशा विविध ठिकाणी संस्थेमार्फत या बद्दल मोफत फलक पेंट करण्यात आले आहेत. नगरीकणी या ठिकाणी वावरताना नियमांचे पालन करावे व इतरांना पान जागृत करावे असे आव्हान मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी श्री अभिजीत संघई यांनी  केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.