सायखेड येथे अवैध मुरुम वाहतूक करणारे चार वाहन जप्त

0

धर्माबाद (प्रतिनिधी) : धर्माबाद तालुक्यातील मौजे सायखेड येथील तलावाशेजारी असलेल्या शासनाच्या जागेतून मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उतखनन होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच धर्माबाद चे तहसीलदार दतात्रय शिंदे यांनी स्वतः धाडसी कार्यवाही करीत अवैध मुरुम उतखनन व वाहतुक करणारे 4 ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसिल कार्यालयात जमा केले आहेत.

तालुक्यातील अवैध मुरुम उतखनन,अवैध वाळू उपसा याबाबतीत कार्यवाहीसाठी धर्माबाद चे तहसीलदार दतात्रय शिंदे यांनी धडक कार्यवाही ची मोहीम हाती घेतली आहे.कांही दिवसांपूर्वीच संगम नदीतील वाळु उपसा प्रकरणी कार्यवाही झाली होती.तर आज अवैध मुरुम उतखनन प्रकरणी धाड टाकण्यात आली. एका बाजूने तहसीलदार स्वतः कार्यवाही करीत असताना संबंधित विभागाचे बिट जमादार, तलाठी व मंडळ आधिकारी मात्र याकडे का दुर्लक्ष करीत आहेत. असा सवाल जनतेतून व्यक्त केल्या जात आहे.
तहसीलदार दतात्रय शिंदे यांच्या कार्यवाहीने संबंधित मुरूमचोर,रेती माफिया चांगलेच गोत्यात आले आहेत.या प्रकारास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे तलाठी,व बिट जमादार यांच्या विरुध्द उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधीक्षक काय कार्यवाही करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.