सातपुडा पर्वत अतिक्रमणाचा विळख्यात

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-एकीकडे पर्यावरण व निसर्ग वाचवण्यासाठी शासनाची वृक्ष लागवडीची लगीनघाई सुरू असते असे असले तरी दुसरीकडे सातपुडा पर्वताचा कपारीत सुरू असलेली वृक्षतोड आणि त्यातून तयार होणारी जमीन याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

या अतिक्रमणाची चाहूल वनविभागालाही असल्याची चर्चा असून त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे बोलले जात आहे.वनदावे दाखल झाले तरीते टिकणे अवघड असतांना झाडे तोडून जमिनी तयार होत असल्याची स्थिती बऱ्याच भगत सुरू आहे.त्यासाठी आदिवासी बांधवांमध्ये वनहक्क कायद्याबाबत जनजागृती होऊन वृक्षतोडीविरुद्ध कठोर कायदा होणे आवश्यक आहे.

अश्याप्रकारे वृक्ष तोडून तयार होणाऱ्या जमिनी फॉरेस्ट नष्ट करू लागल्या आहेत.सातपुड्याच्या रांगांमध्ये गेल्या दशकांपूर्वी फारच कमी भागात जमिनी दिसून येत असत.मात्र अलीकडे बऱ्याच भागात जमिनी काढल्या जात असून वनविभागाचे दिवसेंदिवस क्षेत्र कमी होणे ही बाब चिंताजनक असल्याची खंत निसर्गप्रेमी विश्राम तेले यांनी दै.लोकशाही शी बोलतांना व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.