साखरपुड्याासाठी लक्झरी वेळेवर न पाठविणे भोवले

0

जळगाव, दि.2 –
तालुक्यातील बोरणार येथील दिनकर चौधरी यांनी मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बुक केलेली लक्झरी वेळेवर न आल्याने दोघांनी ग्राहकाची फसवणुक केली होती. तसेच ग्राहकांने दिलेला ऍडव्हॉन्स परत न केल्याने तिघांविरुध्द जिल्हापेठ पेलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून एका वर्षाची साधी शिक्षा, प्रत्येकी 10 हजार रुपये दंड व दंडातील 10 हजार रुपयांची नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश शुक्रवारी दिले.
तालुक्यातील बोरनार येथील दिनकर वासुदेव चौधरी यांच्या मुलाचा दि.12 एप्रिल 2015 रोजी नाशिक येथे साखरपुडा असल्याने त्यांचा मुलगा प्रशांत याने स्टेडीअम कॉम्प्लेक्स समोरील पुरोहीत टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स येथून लक्झरी बुक केली होती. यावेळी प्रशांत याने ट्रॅव्हल्स कंपनीचे सचिन अशोक मोरे रा.रामेश्‍वर नगर, अजय कैलास पुरोहीत रा.शनिपेठ व मनोज अजबराव बोरसे यांना ऍडव्हॉन्स म्हणून 7 हजार 500 रुपये दिले होते. त्यानुसार दि.11 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत बस येणे अपेक्षित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.