सन २०२० शेतकरी वर्गासाठी ठरलेय घातक

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : सन २०२० हे साल आपत्ती ग्रस्त साल म्हणून ठरत असून शेतकरी वर्गासाठी तर घातकच ठरले आहे. या वर्षात अनेक अपत्त्या आल्या कोरोनाच्या महामारी मुळे शासनाला लॉक डाऊन करावे लागल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले मार्केट बंद असल्यामुळे शेती माल कवडीमोल भावाने विकावा लागला २००० रुपये मणने विकला जाणारा कांदा अवघ्या २०० रुपये मणने विकावा लागला २५००शे रुपये क्विंटल ने विकली जाणारी बाजरी १२०० ते १५०० रुपये क्विंटल भावाने विकावी लागली त्याच प्रमाणे गहू कापूस सोयाबीन मका हरभरा आदींचे झाले. एकदम कमी भावात खरेदी करुन खाजगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला लुटून काढले ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढण्याची आशा करुन कापूस घरात ठेवला त्यांना सि सि आय कडे कापूस विक्रीसाठी अजूनही नंबर लावावा लागत असून शेतकऱ्यांचे पांढरे सोने विकण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत त्यात कोरोनाची महामारी बाहेर निघू देत नाही निसर्ग सारखा कोपत असून पाऊस येत नसल्याने पिक परिस्थिती धोक्यात येवून काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

कंपन्याबंद ठेवण्यात येत असल्याने अनेक मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे म्हणजे २०२०सर्वच क्षेत्रातील लोकांना खुप काही घाला घालत असून शेतकरी वर्गाला आर्थिक खाईत लोटून दिले आहे. सुसक्षित बेकारांना नोकरी नाही त्यामुळे शिक्षण करुनही घरी बसण्याची पाळी आली आहे. शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे विविध विकास कामे थांबली आहेत त्यामुळे हे वर्ष सरकारसह सर्वांवरच आघात करणारे ठरले असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.