सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करा

0

अमळनेर (प्रतिनिधी)- स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या तरुण पिढीने आत्मसात केल्यास सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी मोठे योगदान ठरेल असे देवगाव देवळी येथे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून बक्षीस वितरण समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक अनिल महाजन बोलत होते.

ते पुढे म्हणाले की ते पुढे म्हणाले की स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळ मिळणार नाही आपला वेळ सत्कारणी लावा थोर पुरुषांच्या विचार  आत्मसात करा असे सांगितले.

कार्यक्रमात विचारपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के ,शिक्षक एस के महाजन होते .कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय  आर.महाजन यांनी केले.

इयत्ता नववीतील नंदिनी जाधव, इयत्ता दहावी मधील अश्विनी महाजन, नंदिनी डांगे यांनी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. शाळेत हिंदी राष्ट्रभाषा सुबोध परीक्षा व प्रबोध परीक्षा घेण्यात आली होती .शाळेचा शंभर टक्के निकाल लागला त्यात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापक व मान्यवरांनी केला व सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली व उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षाबाबत मार्गदर्शन हिंदी शिक्षक आय.आर.महाजन यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.