संविधान दिनी लोकशाही “लोकारोग्य” दिवाळी अंकाचे प्रकाशन

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- मुक्ताईनगरला 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाला शासकीय विश्रामगृह येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पाने, दीपाने व धुपाने एस.एम.कॉलेज चे प्राचार्य डॉ. आय.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मुक्ताईनगर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनायक वाडेकर , प्रा.एल.बी.गायकवाड व लोकशाही तालुका प्रतिनिधी मोहन मेढे यांनी पुष्प वाहून वंदन केले आणि संविधान दिनाचे औचित्य साधून दैनिक लोकशाही दिवाळी अंक लोकारोग्य चे प्रकाशन प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सुरुवातीला डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी वंदन केले व उपस्थित मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले असता म्हटले की , 26 नोव्हेंबर 1949 या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीला पवित्र असे संविधान बहाल केले तेव्हापासून या देशात लोकशाही नांदत आहे सर्वांना समान हक्क व अधिकार भारतीय राज्यघटनेत दिलेले असून समता व बंधुता आहे.

प्रसंगी प्रा. एल.बी गायकवाड ,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनायक वाडेकर, परिवर्तन कला मंचचे अध्यक्ष सखाराम हिरोळे, भोई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर ,पत्रकार संघाचे सचिव संदीप जोगी, सदस्य छबिलदास पाटील, अमोल वैद्य ,निखिल बोदडे, निलेश मेढे आदि उपस्थित होते. दैनिक लोकशाहीचे तालुका प्रतिनिधी मोहन मेढे यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.