संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ विविध संघटनांतर्फे प्रांतांना निवेदन 

0

भुसावळ : संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ विविध संघटनांतर्फे आज २३ रोजी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, भिमा कोरेगाव प्रकरणातुन महाराष्ट्रात हिंदु मध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न काही राष्ट्रदोहृयातून करण्यात आला. काही लोक आमच्या समजुतदारपणाचा चुकीचा अर्थ  काढत आहे.

व उदात्त हेतूने राष्ट्रकार्य,धर्मकार्य, शिवकार्य करणाNया संभाजी भिडे गुरुंजीचे नाव विनाकारण बदनाम करीत आहे. महाराष्ट्रात  विद्वेष निर्माण करणाऱ्या व गुरुजींवर खोटे आरोप करणाNया  राष्ट्रदोह्यांवर योग्य ती कारवाई करावी असे नमुद केले आहे. निवेदनावर स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष  रितेश सुभाष जैन, जय लेवा गृृप पियुष राजेंद्र महाजन, हिंदू जनजागृती समितीचे भुषण रेवा महाजन, नवयुवक मित्र मंडळ भुषण जितेंद्र पाटील,  भुषण कोळी, धिरज पाटील, प्रविण  परदेशी,  शुभम  दिलीप सिंग पचेरवाल, राजेश अशोक ठाकुर, गौसेवा  परिवाराचे कृष्णा राजू साळी, निखील  नेमाडे, निखील  तायडे,  हितेश टकले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.