संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित अभिवादन

0

जळगाव : मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात संत गाडगेबाबा आणि संस्थेचे संस्थापक सुरेश नाईक यांच्या जयंती निमित अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.

प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांनी तर सुरेश नाईक यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका शितल कोळी यांनी माल्यार्पण केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ अशी भजने सादर केली. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर यशस्वी योगेश पाटील, साक्षी शिरसाळे, भाग्यश्री मिस्त्री, भावेश पालवे, उत्कर्षा सपके, उर्वशी सपके यांनी माहिती सांगितली. स्वच्छते विषयी विद्यार्थ्यांना उज्ज्वला नन्नवरे यांनी माहिती दिली. प्रसंगी विद्यालयाच्या परिसरात शिक्षक आणि विद्यार्थ्यानी साफसफाई अभियान राबविले.

सूत्रसंचालन आम्रपाली शिरसाठ यांनी केले. आभार साधना शिरसाठ यांनी मानले.
विद्यालयातील शिक्षक कविता बढे, शोभा सपके, गीता भावसार, किरण पाटील, छाया केदार, हर्षा काळे, माधुरी विधुर,माधुरी सपकाळे,रोहिणी शिंदे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.