संजय राऊत कोण आहेत? ते काय इतके मोठे नेते आहेत काय? – देवेंद्र फडणवीस

0

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत आपले म्हणणे काय असा प्रश्न विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केला असता संजय राऊत कोण आहेत? ते काय इतके मोठे नेते आहेत काय? असे म्हणत राऊत यांची खिल्ली उडवली. राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांची राज्यपाल कोश्यारी यांनी दाखल घ्यावी अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून रिपोर्ट मागवून माहिती मागवावी असहि विरोधी पक्षाने म्ह्टले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव यांना एक अहवाल सादर केला आहे. हा अहवाल म्हणजे लवंगी फटका असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. यावर मी दिलेला अहवाल लवंगी फटका आहे कि ऍटम बॉम्ब आहे हे लवकरच लक्षात येईल. यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार आहेत कि ज्यांना वाचवण्यासाठी तुम्ही हि माहिती लपवून ठेवली. मी केंद्रीय गृहसचिवांना दिलेला अहवाल छोटा फटका आहे कि मोठा बॉम्ब आहे हे लवकरच समोर येईल. कोण कोणापर्यंत माल पोहोचतो? यात कोणकोण सहभागी आहे? याचे काम कसे चालते हे सर्व त्यातून बाहेर येईल असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच संजय राऊतांकडे खूप वेळ आहे. ते काही इतके मोठे नेते नाहीत कि मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आम्हाला काही वाटलं तर आम्ही राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आमचे म्हणणे मांडतो. संजय राऊत हे काही अधिकृत व्यक्ती नाहीत. त्यांचे म्हणणे सरकारचे म्हणणे आहे असे म्हणता येणार नाही असं म्हणत फडणवीस यांनी राऊतांच्या विधानावर उत्तर देणे टाळले.

Leave A Reply

Your email address will not be published.