शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी एकत्र

0

तर मराठी हा मुद्दा गौण केवळ जाहिराती, आघाडीच्या काळातील योजनांचे नाव बदलले,

कोणतेही प्रकल्प सुरू नाहीत या मुद्यांवर भाजपाला हरविणार

जळगांव.दि.5-
राज्यात येत्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणूका जाहिर होणार असून भाजपा कडून उमेदवार जाहिर केलेले नाहित, आघाडीने देखिल दोन्ही जागा राष्ट्रवादीने दावा सांगीतला तर शिवसेनेने जळगांव मतदार संघासाठी उमेदवार जाहिर करून येत्या 15 तारखेस पाचोरा येथे जाहिर मेळावा देखिल आयोजित केला आहे.गेल्या चार साडेचार वर्षात सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या विकास कामांसदर्भांच्या मुद्दयांवर निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे सत्तारूढ भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते सांगतात तर अनेक प्रकल्प अपूर्ण असून बेरोजगारी नोटबंदी, कर्जमाफी, पेट्रोल,डिझेल, गॅस इंधन दरवाढीमुळे महागाईत भर पडत असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे या मुद्दयांवर सहकारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह एमआयएम,मनसे आदी सर्व विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध म्हणून भाजपाला हरवायचे या दृष्टिकोनातुन निवडणूकीच्या रिंगणात उतरत आहेत असा सुर वेध लोकसभेचे या लोकलाईव्हच्या दिलखुलास मुलाखतीत विविध पक्षांच्या जिल्हा प्रमुखांनी व्यक्त केला.
या मुलाखतीत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील, राष्ट्रवादीचे विभागीय प्रवक्ता योगेश देसले, शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, मनसेचे जिल्हा सचीव जमील देशपांडे, एमआयएमचे रेयान जहागीरदार आदी सहभागी झाले होते.
जिल्ह्यात भाजपाचे 6 आमदार,3 विधानसभा सदस्य, 2 खासदार आहेत. विद्यमान उमेदवारांना तिकिट मिळेल कि नाही याबद्दल निश्चित झालेले नसले तरी उमेदवार निवड हा मुद्दा गौण असून भाजपा संघटनशक्ती व कार्यकत्यार्ंच्या बळावर निवडणूकीला सामोरे जाणार आहे. जिल्हयात 6 लाख 17 हजार प्राथमिक सदस्य, 4 हजार 220 सक्रिय सदस्य संघटन,शहरात 1967 बुथ, जिल्हयात 1972 असे 3800 मतदान केंद्रनिहाय प्रत्यक्ष 30 कार्यकर्ते यानुसार 1 लाख 38 हजार कार्यकर्ते जिल्हा परीषद, पंचायत समिती गण-गट निहाय 20 मंडळात 2हजाराचे वर मेळावे माजी मंत्री एकनाथराव खडसे, ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातुन व मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात भक्कम असा पाठींबा संघटनेच्या आधारावर दोनही लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार निवडून येतील तर शिवसेनेसोबत युती व्हावी अशी मनोमन ईच्छा आहे.
दलालांना बाजुला सारले
उज्ज्वला गॅस, गेल्या 70 वर्षात रस्ते झाले नाहीत नही अंतर्गत रस्ते विकास करत असतांना थोडा फार त्रास होईल, शेतकर्‍यांना कर्जमाफी देतांना ऑनलाईन प्रकियेत दलांलांना बाजूला सारले, आधीच्या सरकारने कर्जमाफी दिलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या नाहीत, रेल्वे संदर्भात केवळ टिका जसा चष्मा तसे दिसेल रेल्वेस्टेशन सुशोभीकरण, प्रमुख रेल्वेस्थानकांवर वयोवृद्ध जेष्ठ नागरीक, दिव्यांगांसाठी सरकते जिने, लिप्ट सुविधा कोच फॅक्टरीसाठी मान्यता, राजधानी कोणी सुरू केली हा प्रश्न गौण असून 1400 कामापैकी 1200 कामे पुर्णत्वाकडे वाटचाल करीत पाडळसरे धरण पुर्णत्वास नेणार जलयुक्त शिवार, शेततळे, रस्ते विकासांतर्गत पुलासहित बंधार्‍यांची निर्मिती दोनही खासदारांचा जनसंपर्क नेहमी आहे. शेतामालाला दिडपट भाव मिळवून दिलेला आहे.
जलयुक्तची कामे केवळ कागदावरच- काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील
निवडणूक संदर्भात आघाडी होणार किवा नाही याबाबत सांशकता नाही, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता बदल झाले आहेत.दोन महिन्यापुर्वी 3 राज्यात विधानसभा निवडणूकीत विजय मिळविला असून जिल्हयात कार्यकर्ते पदाधिकारी बुथनिहाय कामाला लागले असून एक मतदार संघ राष्ट्रवादीने घ्यावा, संघटनात्मक बांधणी झाली असून प्रभारी चेल्लारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. आघाडी होणार नाही असा प्रश्न उद्भवत नाही. मोदी लाट ओसरली असून सर्वसामान्य जनतेत मोठया प्रमाणावर रोष आहे. पेट्रोल,डिझेल,गॅस इंधन दरवाडीमुळे जनता महागाईच्या ओझ्याखाली दबली गेली आहे. जिल्हयात जलयुक्त शिवार जलसंधारणे रस्ते विकास असे अनेक कामे केवळ कागदावरच आहेत. सुधारणा केवळ नावालाच आहेत. राजधानी एक्सप्रेस केवळ बडया लोकांसाठी आहे. सर्वसामांन्यासाठी कोणत्याही उपयोगाची नाही. विकास कामांचे अथवा योजनांचे पैसे शेतकर्‍यांना मदत म्हणून द्या, 50 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही, जिल्हयात कोणतेही रोजगारक्षम उद्योगधंदे नाहित, कॉग्रेसचे सरकार आल्यास शेतकर्‍यांसाठी तात्काळ कर्जमाफी लागू करणार 3 राज्यात तात्काळ कर्जमाफी करण्यात आली आहे. सहा हजार रूपये वार्षिक म्हणजे 17 रूपये रोज प्रमाणे शेतकर्‍यांना मदत देणार तो देखिल पुढच्या अर्थसंकल्पीय वर्षात सत्ता येते कि नाही यावर अवलंबून आहे. त्यामुळे हि केवळ फसवणूक आहे. या सरकारने बलुन बंधारे हे केवळ गाजर दाखवले आहे. केळी उत्पादक मतदार संघ असून केळी पिकाला फळाचा दर्जा मिळवून देउ शकले नाहीत, अनेक वेळा नैसर्गिक आपत्तीत कोणतीही मदत दिलेली नाही. शेजारच्या मध्यप्रदेश राज्यात त्यामानाने बरी मदत देण्यात आली होती. जळगांव विमान तळ हे कॉग्रेस काळात निर्मीती झाली होती परंतु सद्यस्थितीत विमानसेवा बंद आहे. खासदार हे कमी पडत आहेत. हि पोकळी भरून काढणार
आमच्याच योजना, केवळ नाव बदलले- राष्ट्रवादी विभागीय प्रवक्ता, योगेश देसले.
15 तालुक्यात पुर्णपणे निवणूकीसाठी तयारीनिशी असून बुथकमिटंयांच्या माध्यमातुन जनसंपर्क मोठया प्रमाणावर सुरू आहे.त्यानुसाार पक्षाचा मेळावा आयोजन करण्यात आले आहे. आघाडी होईल की नाही हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील. या पुर्वी 2009 व 2014 असे दोन्ही वेळा राष्ट्रवादीकडून दोनही मतदार संघात निवडणूक लढविली होती. या वेळी देखिल दोन्ही मतदार संघ लढविणार आहे. अनिल पाटील, प्रमोद पाटील, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा झाली आहे.तर संतोष चौधरी,अरूण भाई गुजराथी यांचा संपर्क रावेर मधे आहे. भाजपासरकार देशात आहे. गॅस सिलेंडर 950 रूपये, नोटबंदी गेल्या 60 वर्षात झाली नाही परंतु यांनी नोटबंदी करून शेतकर्‍यांना शिवीगाळ केली जाते. 5 वर्षात दोनही खासदारांनी केवळ रेल्वेला थांबे दिलेत रेल्वे थांबा मिळवणे हे सर्वसामान्य जनतेच्या मागणीने देखिल पुर्ण होउ शकेल, कोणतेही प्रकल्प नाहीत, केवळ जाहितीच्या माध्यमातुन चमकतात, बेरोजगारीचा मुद्दा दडपला त्यामुळे सर्वसामांन्यांचा भ्रमनिरास झाला आहे. हे सरकार गेलेच पाहीजे, ठिकठिकाणी परीवर्तन झाले पाहीजे.
जनतेला दखवलेली स्वप्ने आश्वासनांची पुर्तता नाही.
जिल्ह्यात दोन मंत्री होते एकाने राजीनामा दिला, एक चर्चेत आहे, पालकमंत्री केवळ नावालाच आहेत ते येतात केवळ आढावा बैठकीत, जिल्हयात विमान सेवा बंद आहे. रस्ते धुळ व खड्डेयुक्त आहेत.16 हजार 500 कोटीचे रस्ते कोनशिला नागपुर कि नेमकी कोठे हे कळत नाही. या कामांचे श्रेय सर्वच घेत आहेत. रस्त्यांच्या कामासंदर्भात जनतेला उपोषणाला बसावे लागते. जिल्हा परीषद ताब्यात आहे. परंतु पदाधिकार्‍यामधे ताळमेळ नाही. धरणात जलसाठा असून जळगांव शहरात 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा होतो. नियोजन अगदीच कोलमडले आहे. जनतेला दखवलेली स्वप्ने आश्वासनांची पुर्तता झालेलीच नाही. जिएसटी 18 टक्क्यावरून 6 टक्क्यावर आणलास तीन वेळा बदल करण्यात आला. सर्वसामान्य जनतेच्या खाण्यावर, सॅनिटरी पॅडवर देखिल जिएसटी, कापूस बोंडअळी अनुदान अजुनही पुर्ण झालेले नाही, शेतकर्‍यांना कांदा उत्पादन मोफत वाटप करावे लागले, हि तिव्रता जनतेसमोर मांडणार असून परीवर्तन हल्लाबोल या व्दारे जिल्हयात परीवर्तन होईल असे मत योगेश पाटील यांनी मांडले.
निवडणूका येतात तेव्हाच कार्यकर्ते कामाला लागतात- अ‍ॅड. जमिल देशपांडे
इलेक्शनच्या तोंडावरच यांच्या पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागतात आमचे तसे नाही. मनसे नेहमीच कार्यरत आहे. निवडणूक कामाव्यतिरिक्त सर्वसामान्यासाठी नेहमीच आवाज उठवत आहे. मनसे दोन्ही मतदार संघात जागा लढवेल. मराठी हा मुद्दा गौण असून निवडणूक संदर्भात राजठाकरे निर्देश देतिल त्याप्रमाणे काम सुरू आहे. भाजपाचे सरकार देशात असून काय केले हे पंतप्रधानांनी दाखवले आहे. गॅस सिलेंडर 950 रूपये, नोटबंदी,शेतकर्‍यांचे कायम रडगाणे म्हणून सर्वसामान्यांना हिणवले गेले, बेरोजगारी युवकांना रोजगार नाही, उदयोगधंदे बंद आहेत. सहकार क्षेत्र संपवले असून ठेविदारांचा प्रश्न कायम प्रलंबित आहेत. 2000 कोटी रूपयांच्या सर्वसामान्यांनी विश्वासने ठेवलेलेा पैसा बुडीत आहे. प्रशासकिय योजना केवळ कागदावरच आहेत. दुष्काळी मॅन्युअल इंग्रजीत आहे. केवळ दोनही खासदार रेल्वे थांबे निर्मिती करून गाडयांंना हिरवी झेडी दाखवली म्हणजे विकास असे यांचे धेारणे आहेत. सेना भाजपा एकत्र लढले तरी मनापासून काम करतील की नाही हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. जनतेत एक संदेश गेलेला आहे. सर्व पक्ष एक होत असून भाजपा हा एकाकी पडत आहे.
दलित समाजासाठी कोणतेही कार्य नाही- रेयान जहागीरदार
जिल्हयातच मनपात प्रथमच स्वबळावर एमआयएम चे 4 नगरसेवक निवडूनआले आहेत. असे नव्हे तर इतर ठिकाणी देखिल नगरसेवक निवडून आलेले आहेत. पक्षाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पधरा दिवसात मुक्ताईनगर येथे जाह्रि सभा आयोजन केले आहे. या निवडणूकीसाठी पुर्णपणे तयारी करण्यात आली आहे. या सरकारकडून उद्योगव्यवसायांना भारारी देण्याचा प्रयत्न झालेला नाही. 17 कलमी कार्यक्रमाची कोणतीही अमलबजावणी नाही. दलितांसाठी कोणतेही कार्य करण्यात आलेले नाही. अवैध बांधकाम, वाळू प्रश्नी सुसुत्रता आणण्यात कोणतही प्रयत्न नाहीत दारू दुकानांसाठी रात्रीच्या रात्री अध्यादेश काढण्यात आला रस्ते हस्तांतरीत करण्यात आले. हायवे संदर्भात कार्यक्रम सादर केला गेला. जिल्हाधिकारी देखिल लिहून देतात समांतर रस्ते मात्र विभागाकडून पुर्ण होत नाहीत. शेतकरी इंडस्टीज या संदर्भात कोणतेही निर्णय अंमलबजाणी नाही, सेना भाजपाने कोणतेही काम केलेले नाही. 2 लाख महिलासाठी बिल आणले, त्यात सर्व पक्षांनी विरोध केला होता हि केवळ व्हॉटस अप गॅग आहे. केवळ भाजपाला हरवायचे हा मुद्दा आहे.
युती हा प्रश्न वरीष्ठ पातळीवर- शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे
जिल्हयात युती होते कि नाही हा प्रश्न वरीष्ठ पातळीवरचा असून जळगांव मतदार संघासाठी आर. ओ, पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. रावेर मतदार संघासाठी देखिल चाचपणी सूरू आहे. परंतु निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पाचोरा येथे 15 तारखेस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे येणार आहेत.सत्तेत असून बरेच ठिकाणी कामे झालेली नाहीत. जिल्ह्यातील धरणे सिंचन प्रकल्प यासारखे प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणूकांच्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पक्षादेशानुसार पुढील ध्येयधोरणे वरीष्ठ ठरवतीलच.

Leave A Reply

Your email address will not be published.