शासकीय सेवेतील पद भरतीत काॅम्पुटर टायपिंग समावेश बंधनकारक

0

चोपड़ा (प्रतिनिधी) शासकीय सेवेतील गट अ ब व क संवर्गातील पद भरती जाहीरातीत ज्या अभ्यासक्रमास संगणक अर्हता म्हणुन शासनमान्यता आहे. त्या अभ्यासक्रमाचा समावेश पद भरतीसाठी प्रसिध्द करण्यात येणार्या जाहीरातीमध्ये करणे बंधनकारक असल्याचा निर्णय शासनाच्या परिपत्रकातुन(जी आर )संबधीत विभागाकडे देण्यात आला आहे.चोपड़ा शहरातील अजिंक्य टायपिंग क्लासेसला नुकताच हा शासनादेश प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद् पुणे द्वारा संचालित शासनमान्यता टंकलेखन संस्थेतुन विद्यार्थी इंग्रजी ३०/४० व मराठी ३०/४०चे प्रशिक्षण घेत असतात या प्रमाणपत्राला शासनाकडुन संगणक अर्हता देण्यात आली आहे, या करीता संघटनेचे राज्याध्यक्ष मा कैलास जगताप यांनी या संदर्भात पाठपुरवा केला आहे, आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झाले आहे .अशी माहीती दंडवते यांनी दिली.
५ फ्रेबुवारी रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णय क्र से प्र नि १०९८/ प्र क ७/९८/१२ / २५ जानेवारी ते ५ फ्रेबुवारी नुसार ही मागणी बंधनकारक करण्यात आली आहे,

 

यात शासकीय विभाग, कार्यालये , महामंडळ, स्वायत संस्था उपक्रम इत्यादींचा समावेश आहे .या आदेशामुळे राज्यभरातील टंकलेखन प्रशिक्षण देणार्या संस्था चालक व पालक, विद्यार्थींमध्ये समाधान दिसुन येत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.