शारदा विद्या मंदिरात शाळा सुरू करण्याबाबत पुर्वतयारी पुर्णत्वाकडे !

0

साकळी ता.यावल (वार्ताहर) : जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दि १ डिसें २०२० आदेशानुसार शैक्षणिक वर्ष-२०२०-२१ या वर्षाकरिता इ.९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू दि.८ डिसे.२०२० करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून साकळी ता. यावल येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात दि.५ रोजी पालक- शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य जी.पी.बोरसे होते. तर व्यासपिठावर शिक्षक एम.ए.महाजन पालक सूर्यकांत नेवे, रविंद्र नेवे,मनोज नेवे हे  उपस्थित होते.याप्रसंगी प्राचार्य जी.पी.बोरसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शाळा सुरू होण्याच्या अगोदर शाळेच्या संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात येणार असून वर्ग व ओटयावरील संपूर्ण भाग सॅनिटाईज केला जाणार आहे .सफाई कर्मच्याऱ्यांकडून विद्यार्थी व शिक्षकांच्या वापरातील संडास व बाथरूम स्वच्छता केली जाणार आहे.त्याचप्रमाणे यावल  गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शाळा सुरु होण्या अगोदर खबरदारी घेण्याबाबत शाळेच्या वतीने मुख्य चौकात सूचना फलक लावण्यात आलेला होता.त्यानुसार गावातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थी पाल्याला शाळेत पाठवण्या बाबत संमतीपत्र भरून घेतलेले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत येतांना तोंडाला मास्क लावून येणे सक्तीचे केलेले आहे . त्याप्रमाणे शाळेत येतांना आपल्या स्वतःचा घरूनच  जेवणाचा डबा व पिण्याच्या पाण्याची बॉटल भरून आणायची आहे.

त्याचप्रमाणे वर्गातील कोणत्याही वस्तूला स्पर्श न करण्याबाबत तसेच वारंवार हात स्वच्छ धुण्याबाबत तसेच सोशल डिस्टंन ठेवूनच नेमून दिलेल्या आप-आपल्या जागेवरच बसण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.तसेच प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांची बॅच करून एक- एक दिवसाआड वर्ग भरवले जाणार आहे .वर्गात शालेय नियोजनाप्रमाणे इंग्रजी, गणित व सायन्स या विषयाचे दररोज एक तासिका तर इतर विषयांचा एक याप्रमाणे चार तासिका घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार नियोजनानुसार जास्तीत- जास्त अभ्यासक्रम पूर्ण केल्या जाणार आहे .वर्गातील शिक्षक विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र पालकांनीसुद्धा आपल्या विद्यार्थी पाल्याला शाळेत पाठवितांना शाळेने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत आपल्या पाल्याला सांगावे व पालकांनी शालेय प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन प्राचार्य यांच्यावतीने करण्यात आलेली आहे . तत्पूर्वी

दि २० रोजी संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शासनाच्या नियमांनाअधीन राहून व सुचवलेल्या सर्व खबरदारीच्या उपायोजना करून तसेच योग्य ती काळजी घेऊनच शाळा सुरू करण्याच्या शालेय प्रशासनाला सूचना दिलेले आहे . शिक्षक-पालक सभेचे सूत्रसंचालन आर.सी. जगताप (सर) यांनी तर आभार आर.जे. महाजन (सर) यांनी केले. यावेळी पालक व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.