व्हीआयपी रुग्णांना रेमडिसिव्हीयर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा सुरूच ; गोरगरीब रुग्ण वाऱ्यावरच

0

चिखली (प्रतिनिधी) : सर्वत्र कोरोना रुघ्नांच्या आकडेवारीत प्रचंड वाढ होत असल्याने सहाजिकच रेमडिसिव्हीयर इंजेक्शनचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु खरी परिस्थिती बघितली असता प्रत्येक कोव्हिडं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या राजकीय नेत्यांचे नातलग त्यांचा  स्कोर कमी जरी असला तरी त्या व्हीआयपी रुगणांना इंजेक्शनचा पुरवठा अगदी सहज सुरळीत होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

फक्त या तुटवड्याचा सँम्पूर्ण भार हा गोर गरीब रुगणांनाच त्यांचा स्कोर किती ही जास्त असो ते इंजेक्शन साठी वन वन भटकतांना दिसत आहेत व त्यांना कुठेच इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने  त्यांनाच सर्वात जास्त त्रास सोसावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे, यात काही नफेखोर डॉक्टर व मेडीकल वाले सोडले असता बहुतांश  डॉक्टर किंवा मेडीकल धारक दोषी नसून जो तो मिळेल तिथून इंजेक्शनची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहेत व डॉक्टर ही रुगणांना मिळेल तिथून इंजेक्शन उपलब्ध करण्याचे सांगत आहेत,

 

कोरोनाच्या कहर जगभर सुरू असून इंजेक्शनच्या तुटवड्याला मात्र फक्त नि फक्त गोरगरीब रुगणांनाच सामोरे जावे लागत असून व्हीआयपी रुगणांनाकडे रोज कुठून ना कुठून रेमडिसिव्हीयर  इंजेक्शन उपलब्ध होतच आहेत, त्यात त्यांनी म्हटले आहे की जिल्ह्याभरातील कोणत्याही कोव्हिडं रुघ्नालयाला भेट देऊन बघा त्यात जे कोणी राजकीय पक्षांचे नेते असतील त्यांच्या अगदी जवळचे  नातलग असतील बडे अधिकाऱ्यांचे नातलग असतील किंवा गलेलठ्ठ पैसेवाले रुघ्न असतील त्यांना कुठेच रेमडिसिव्हीयर इंजेक्शनची कमतरता भासत नाही आहे. ही विदारक वस्तुस्थिती असून स्वतः सर्वेक्षण करून किंवा आपल्या परिचयाचे डॉक्टर असतील, कम्पाउंडर असतील किंवा आरोग्य क्षेत्रातील जाणकार असतील यांच्या कडून खाजगीत सत्यता पडताळून बघा आपला ही या रेमडिसिव्हीयर इंजेक्शनच्या तुटवड्या विषयी असलेला समज गैरसमज स्पष्ट होईल,

रोज या व्हि आय पी रुगणांना लागणारे हे इंजेक्शन कुठून तरी अदृश्यपणे रुघ्नांच्या नातेवाईकांकडे उपलब्ध होत आहेत हे तर निरुतरीत करणारेच आहे जिथे गोर गरीब रुगन्नाचा स्कोर 18 च्या वर असतो त्याला इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत व ज्या व्ही आय पी रुघ्नांचा स्कोर 0 चा जरी असला तरी त्याला मुबलक प्रमाणात रेमडिसिव्हीयर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत ही सध्याची वस्तुस्थिती आहे,

जिल्ह्यात जरी इंजेक्शन कमी प्रमाणात येत असतील तरी ते रोज उपलब्ध होत असून  ते फक्त विशिष्ट एजन्सी धारकांनाच उपलब्ध होत असून काही अपवाद वगळता  मोजक्याच मेडीकल धारकांमार्फत व्हीआयपी रुघ्नांच्या नातेवाईकांपर्यंतच रेमडिसिव्हीयर इंजेक्शन पुरवल्या जात असल्याचे स्पष्ट होत आहे,

अन्न व औषध प्रशासन यांच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने फक्त कोव्हिडं हॉस्पिटलला सलंगणीत असलेल्या मेडीकलाच रेमडिसिव्हीयर इंजेक्शन पुरवठा होऊ शकतो त्यामुळे इतर मेडीकलला होणारा पुरवठा खंडित केला असून ठराविक मेडीकल धारक जो तो फक्त आपल्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या रुघ्नांनाच इंजेक्शनचा पुरवठा करत आहेत इतर हॉस्पिटलमध्ये सिरियस जरी रुघ्न असला तरी त्यांना इंजेक्शन देऊ शकत नसल्याने गोर गरीब रुगणांचे खूप हाल होत आहेत,तरी खरी वस्तुस्थिती म्हणजे आज रोजी व्ही आय पी रुगणांना सुरळीत इंजेक्शन पुरवठा सुरू असून गोर गरीब रुघ्नांना मात्र वाऱ्यावर सोडले जात असून कोव्हिडं हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी देखील आपण ज्या प्रमाणात रेमडिसिव्हीयर इंजेक्शन व ऑक्सिजन उपलब्ध असेल तरच रुघ्न भरती करावेत अन्यथा सरकारी कोव्हिडं हॉस्पिटलमध्ये मुबलक प्रमाणात रेमडिसिव्हीयर असल्याने त्यांच्याकडे रेफर करावे उगाच रुघ्नांच्या जीवाशी खेळू नये असे परखड मत रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे जॉईंट सेक्रेटरी प्रशांत ढोरे पाटील यांनी व्यक्त केले आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.