व्यवसायासाठी माहेरहुन ५ लाख रुपये आणावे म्हणुन विवाहितेचा छळ

0

पाचोरा (प्रतिनिधी) : नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहुन ५ लाख रुपये आणावे. या कारणावरुन विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीतीने सासरच्या ८ जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय मालचे हे करीत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कविता महेश सोनवणे हिचा गेया ६ वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ होत होता. तसेच माहेरहुन व्यवसायासाठी ५ लाख रुपये आणावे अशी मागणीही वारंवार होत असल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून कविता हिने पाचोरा पोलिसात महेश पंढरीनाथ सोनवणे (पती), पंढरीनाथ सदा सोनवणे (सासरा), मथुराबाई पंढरीनाथ सोनवणे (सासु), सुनिल पंढरीनाथ सोनवणे (जेठ), अनिता सुनिल सोनवणे (जेठाणी), निर्मलाबाई जिभाऊ सुर्यवंशी (ननंद), जिभाऊ सुर्यवंशी (नंदोई), बंटी जिभाऊ सुर्यवंशी (भाचा) सर्व रा. राजीव गांधी काॅलनी, पाचोरा अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पो. हे. काॅ. अजय मालचे हे करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.